महिला बालकल्याण सभापतीपदी शोभा बारी बिनविरोध निश्‍चित !

0

स्थायी सभापतीपदासाठी अ‍ॅड.पोकळे,अ‍ॅड.हाडा,बालाणी,घुगे यांचे अर्ज
जळगाव-मनपा स्थायी सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.दुपारी भाजपच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले.महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी शोभा बारी यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे.तर स्थायी सभापतीपदासाठी भाजपतर्फे अ‍ॅड.दिलीप पोकळे,अ‍ॅड.शु चिता हाडा,भगत बालाणी,राजेंद्र घुगे-पाटील यांनी नगरसचिव सुनील गोरोणे यांच्याकडे अर्ज दाखल केले असून दि.30 रोजी निवडीची विशेष सभा होणार आहे.

मनपा बालकल्याण समिती सभापतीपदासाठी शोभा बारी यांनी दोन अर्ज दाखल केले आहे. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून मिनाक्षी पाटील,अनुमोदक म्हणून चेतना चौधरी तर दुसर्‍या अर्जावर सूचक म्हणून गायत्री शिंदे,अनुमोदक म्हणून शेख हसीनाबी शरीफ यांची स्वाक्षरी आहे. शोभा बारी यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे.तसेच मनपा स्थायी सभापतीपदासाठी भाजपच्या चार सदस्यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहे. अ‍ॅड.दिलीप पोकळे यांच्या अर्जावर सूचक म्हणून चेतन सनकत,अनुमोदक म्हणून रेश्मा काळे यांची स्वाक्षरी आहे.अ‍ॅड.शुचिता हाडा यांच्या अर्जावर सूचक म्हणून मुकुंदा सोनवणे,अनुमोदक म्हणून प्रतिभा देशमुख यांची स्वाक्षरी आहे.भगत बालाणी यांच्या अर्जावर सूचक म्हणून सदाशिव ढेकळे,अनुमोदक म्हणून सुनील खडके यांची स्वाक्षरी आहे. भगत बालाणी यांच्या अर्जावर सूचक म्हणून प्रवीण कोल्हे,अनुमोदक म्हणून नवनाथ दारकुंडे यांची स्वाक्षरी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.