पारोळा – तालुक्यातील विविध महा-ई-सेवा केंद्राकडून विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी अर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची ओरड होत असल्याने ती त्वरित थांबवावी तसेच सदरचे दाखले त्वरित मिळवून देण्या कामे योग्य ते सहकार्य संबंधितांनी करावी अशा आशयाचे निवेदन शिवसेने तर्फे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की महा-ई-सेवा केंद्राकडून दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असून विद्यार्थ्यांना कागदपत्रे लवकर न देता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याची ओरड होत असून . त्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी तसेच सदरचे दाखले त्वरीत मिळवून देणे कामी वरील माहिती सेवा केंद्रावर त्वरित कार्यवाही करावी तसेच विविध दाखल्यांसाठी लागणारे शासकीय दरसूची फलक आपल्या कार्यालयात लावून कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करु असा इशाराचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले . यावेळी बाजार समितीचे सभापती व युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अमोल पाटील शहर प्रमुख अशोक मराठे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विवेक महाजन युवा सेना तालुकाप्रमुख आबा महाजन , भूषण भोई व तालुका शहर शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .