महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास सुरुवात

0

कजगाव : पंचायत समिती भडगाव अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान यांच्या वतीने दिनांक ८ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. अर्चना ताई पाटील सभापती पंचायत समिती भडगाव यांच्या अध्यक्षतेखाली महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास सुरुवात करण्यात आली.

सदर कार्यक्रमात महिला बचत गटांना कर्ज वाटपाचे धनादेश देण्यात आले तसेच सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बँका अधिकारी यांचा देखील पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बॅक आमडदे श्री देशपांडे साहेब,  बँक ऑफ बडोदा पिंपरखेड श्री उमेश सर, बँक ऑफ बडोदा शिंदी श्रीमती बच्छाव मॅडम, स्टेट बँक ऑफ इंडिया भडगाव श्री नार्वेकर साहेब, बँक ऑफ बडोदा गिरड श्री राहुल सिन्हा साहेब हे उपस्थित होते. यावेळी महिला बचत गटातील महिलांनी उमेद अभियानामुळे झालेल्या बदलाचे अनुभव कथन केले. तसेच भडगाव येथील श्रीमती ठाकूर मॅडम यांनी सहज योग द्वारे आत्मसाक्षात्कार अनुभुती कार्यक्रम देखील घेतला.  कार्यक्रमास डॉ. विशाल पाटील सामाजिक कार्यकर्ते ही देखील उपस्थित होते.

तसेच डॉ. अर्चनाताई पाटील सभापती पंचायत समिती भडगाव, श्री रावण भिल्ल  सदस्य, श्री बोरसे कृषी अधिकारी ,श्री चिंचोरे प्रशासन अधिकारी, श्री डी पी राजपूत विस्तार अधिकारी सांख्यिकी उपस्थित होते. श्री अतुल पाटील गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करिता श्री प्रशांत महाले तालुका अभियान व्यवस्थापक उमेद अभियान पंचायत समिती भडगाव, श्री प्रशांत परदेशी, श्री लखन चव्हाण यांनी कामकाज पाहिले. तसेच कोविड च्या पार्श्वभूमीवर बचत गटातील महिला व केडर असे ५० पेक्षा कमी महिला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.