Friday, August 12, 2022

महाविद्यालयातील विद्यार्थिनींची छेड काढणारा अटकेत

- Advertisement -

जळगाव;-  शहरातील बेंडाळे महाविद्यालयासमोरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरूणीला अश्लिल हातवारे करून छेड काढणाऱ्या तरूणाला पकडून नागरीकांनी चोप दिला असून जिल्हापेठ पोलीसांच्या स्वाधिन केले आहे. हा प्रकार सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडला.

- Advertisement -

शहरातील एका अठरा ते वीस वर्षीय तरूणी दुचाकीने आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बेंडाळे महाविद्यालयाकडून घरी जात असतांना भारत नानकराम रामचंदाणी (वय-२१) रा. सिंधी कॉलनी, जळगाव हा तरूणीकडे पाहून दुचाकीचा हार्न वाजवित होता. हार्न का वाजविला असा जाब विचारला असता त्याने अश्लिलाभाषा वापरून हातवारे केले. तरूणीने आरडाओरड करताच नागरीकांनी त्याला पकडून चांगलीच बेदम मारहाण केली. यावेळी निर्भया पथकाच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या