भडगाव | प्रतिनिधी ( सागर महाजन )
महावितरण च्या विरोधातील शिवसेनेचे तालाठोक आंदोलन समाप्ती नंतर झालेल्या घटनेत विजवितरण कंपनीचे अधिकारी उप कार्यकारी अभियता यांना अज्ञात सात व्यक्ती कडुन मारहाण करण्यात आली. यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या वायरमनचा धक्काबुक्कीत खाली पडुन मृत्यु झाला आहे. या बाबत अज्ञात सात व्यक्तीन विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेमुळे वायरमन सह कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. घटना स्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांनी भेट पहाणी करत दोषी विरुध्द सक्त कारवाई करण्याचे अश्वासन उपस्थित महावितरणचे कर्मचारी यांना दिले.
भडगाव येथे आज शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांचे कृषीपंप विज तोडणी, कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भडगाव उपविभागातील शहर, ग्रामीण भागातील उपकेद्राना टाळेठोक आंदोलन ११ ते ११-३० वाजेच्या दरम्यान केले. आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर दुपारी १२-४५ वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोड लगत असलेल्या महावितरण कार्यालयात अज्ञात ७ जणानी प्रवेश करत कार्यालयात कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता अजय अशोक धामोरे (वय ४३) रा. पाचोरा यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने प्रवेश करत कॕबिन मध्ये असलेले कंम्प्युटर, युपीएस. तसेच टेबलावरील व कॕबिनच्या काचा फोडत अंदाजे ५० ते६० हजार रुपये पर्यतच्या शासकीय मालमत्तेचे साहित्य फोडुन नुकसान करुन उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना चापटाबुक्क्यानी मारहाण, शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी जवळच हजर असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन प्रताप राणे हे भांडण सोडविण्यास गेले असता अज्ञात इसमानी गजानन राणे यांना देखिल धक्काबुक्की केली. यात गजानन राणे खाली पडुन मयत झाले. अजय धामोरे यांना मारहाण करण्यास आलेले अज्ञात ७ इसम वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन राणे यांचे मरणास कारणीभुत असुन उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असे फीर्यादीत नमुद केले आहे.
याबाबत उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांनी पो.स्टेला दिलेल्या फीर्यादीवरुन अज्ञात ७ इसमा विरुध्द गुरन १३३/२०२१ भादवि कलम ३०७, ३०४, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, २९४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, सह सार्वजनिक मालमत्तेची हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना स्थळी पोलीस अधिक्षक याची भेट
महावितरण कंपनीच्या अधिकारी वर हल्ला वायरमन मयत या घटनेची माहिती वा-यासारखी शहरात पसरली. महावितरणचे कर्मचारी यांनी कार्यालयाकडे धाव घेत अधिकारी यांना धिर देत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, चाळीसगाव भाग उप विभागिय पोलीस आधिकारी कैलास गावडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक कीरणकुमार बकाले यांनी घटनास्थळी भेट देत तपास बाबत मार्गदर्शन केले पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर हे करीत आहे.