महावितरणच्या अमरावती विभागीय कार्यालयावर मनसेचा हल्लाबोल

0

अमरावती (प्रतिनिधी) :  महावितरणने सूरू केलेल्या  थकीत वीज बिल ग्राहकांच्या वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला . सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून . वीज बिलात कोणतेही टप्पे पाळून न देता . सत्तर टक्के वीज बिल भरण्यासाठी महावितरणचे अधिकारी दबाव टाकत असल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे दररोज येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकवेळा निवेदने देऊन आपली खळखट्याक ची खरी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे .

नुकतेच वरुड तालुक्यातील महावितरणच्या कार्यालयाचि तोडफोड  केल्यानंतर .18 मार्च 2021 रोजी अमरावती महानगरातील विज महावितरणच्या  मुख्य कार्यालयावर मनसेचे पदाधिकारी त्याच आक्रमक भूमिकेत आले असता. आधीच तैनात असलेल्या पोलीस प्रशासनाने . महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मनसे कार्यकर्त्यांना रोखले . महावितरणचे मुख्य अभियंता व अधिकारी चर्चा करायला स्वतः प्रवेशद्वारावरच आले होते.त्यावेळी  मनसे पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचा रोष व्यक्त केला.

यावेळी महानगर अध्यक्ष संतोष बद्रे सह शहराध्यक्ष गौरव बांते , जनहित शहर संघटक प्रवीण डांगे, महिला जिल्हाध्यक्ष रीनाताई जुनघरे, शहराध्यक्ष वृंदाताई मूकतेवार, शहर सचिव निखिल बिजवे ,शहर उपाध्यक्ष नितेश शर्मा , सचिन बावणेर  ,सुरेश चव्हाण , प्रवीण राठी, ईश्वर गायकवाड, रोशन शिंदे, शैलेश सूर्यवंशी , सुरज बोराडे ,पवन सावरकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हर्षल ठाकरे, मयंक तांबूसकर मनिष दिक्षित, आदित्य महाकाल, संगीताताई मडावी, वंदनाताई किल्लेदार ,आदि महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.