महावितरणचे उप कार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळे आणि कनिष्ठ अभियंता जयेश गायकर खरे कोरोना योद्धे !

0

पेण : देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासकीय तसेच खासगी कार्यालयास याचा चांगलाच फटका बसत आहे. कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी हे कोरोनाची बाधित होत आहेत, तर शासकिय स्तरावर कोरोना काळात जनसेवा करुन आपले कर्तव्य बजावणाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर कोरोना काळात अशाच प्रकारे तत्परतेने सेवा बजावत असणारे पेण महावितरणचे उप कार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळे आणि हमरापूर शाखा कनिष्ठ अभियंता जयेश गायकर यांनाही कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात यावे अशी मागणी आत्ता पेणकरांमधून होत आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वीज बिलाच्या तक्रारी वाढत आहेत, पेण तालुक्यातील नागरीकांनाही मोठ्या प्रमाणात वीज बिल आले असल्याने पेणच्या कार्यालयात वीज बिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रोजच्या रोजच गर्दी होत आहे. तर याच कार्यालयात काही कर्मचारी कोरोना रुग्ण आढळल्याने कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता व गोरगरीब ग्राहकांना पुन्हा पुन्हा फेऱ्या न मारण्यासाठी पेण महावितरणचे उप कार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळे हे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच जास्त प्रमाणात आलेल्या वीज बिलांवर कशा पध्दतीने उपाय काढण्यात येईल यासाठी आपल्या कार्यालयात बसून तत्परतेने काम करीत असल्याचे पाहताना मिळत आहे. तसेच महावितरणचे हमरापूर शाखेचे कनिष्ठ अभियंता जयेश गायकर हे सुद्धा ग्राहकांना वीज वितरणात व येणाऱ्या विद्युत तक्रारींचे निवारण करण्यात कोणताही वेळ न घालवता सेवा देत असल्याने असे तत्परतेने काम करणारे हेच खरे कोरोना योद्धे आहेत असे पेणकरांमधून बोलण्यात येत आहे. विविध संघटनांच्या वतीने या दोन्ही कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

पेण तालुक्यातील नागरीकांबरोबर त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले असल्याने जेष्ठ नागरीक, वृद्ध महिला यांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी ते सदैव आपल्या कार्यालयात उपस्थित असतात. अनेकदा ग्रामीण भागातील वीज खंडीत होते त्यावेळी स्व:ता त्या जागेवर जाऊन वीज पुरवठा लवकर कसा सुरळीत करता येईल या करीता दिवस असो वा रात्र ते प्रयत्न करीत असतात. महावितरणचे उप कार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळे आणि कनिष्ठ अभियंता जयेश गायकर या दोन्ही अधिकाऱ्यांना शासनाने कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करावे अशी मागणी आत्ता पेणकरांमधून जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.