महाविकास आघाडीची संधी हुकली !

0

राज्यात कॉग्रेस. राष्ट्रवादी. कॉग्रेस. आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला. त्याचे पडसाद कोल्हापूर नगर जिल्हापरिषदेत उमटले अन तेथील जि प असलेल्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लागला. महाविकास आघाडी चे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आले.जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची शुक्रवारी निवडणूक झाली. त्यात कॉग्रेसचा एक सदस्य आणि राष्ट्रवादीच्या एक सदस्या फुटल्याने महाविकास आघाडीच्या तोंडाशी आलेली सत्तेची संधी हुकली. भाजपच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार रंजना पाटील आणि उपाध्यक्षपदाचे लालचंद पाटील याना प्रत्येकी ३४ मते मिळाली आणि महाविकास आघाडीच्या  अध्यक्षपदाच्या  उमेदवार रेखा राजपूत आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री पाटील याना प्रत्येकी ३१मते मिळाली ३ मते जादा मिळवून भाजपने जळगाव जि प वर असलेली आपली सत्ता कायम राखली एकूण ६७ सदस्य संख्या असलेल्या जळगाव जि प भाजपचे ३३ सदस्य. तर राष्ट्रवादी १६.शिवसेना १४.आणि कॉग्रेसचे ४. असे बलाबल होते. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी भाजपने कॉग्रेसला सोबत घेऊन जि प वर आपला झेंडा फडकवला होता. त्याच्या बदल्या ४सदस्य असलेल्या कॉग्रेसला एक सभापती पद दिले गेले होते.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जि प त महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. परंतु कॉग्रेसचे अडावद- धानोरा गटातील सदस्य दिलीप पाटील यांनी आणि राष्ट्रवादीच्या अमळनेर तालुक्यातील पातोंडा -दहिवद गटातील सदस्य मीना रमेश पाटील या दोघांनी पक्षाचे व्हीप झुगारून भाजपला मतदान केले.त्यामुळे महाविकास आघाडीच्या दोन मताच्या जोरावर भाजपचा जि प वर झेंडा फडकला अन्यथा एक मताधिक्याने महाविकास आघाडी जि प सत्तेवर आली असती. कॉग्रेसच्या दिलीप पाटलांनी सभापतीपदाच्या सत्ता भाजपसोबत उपभोगली होती त्यामुळे ते कॉग्रेस पक्षाचे तत्व धा ब्यावर बसवून भाजप सोबत राहणे पसंत केले. त्यांना त्यापोटी पुन्हा पद मिळेल अथवा अभूतपूर्ण व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर अडीच वर्षांपूर्वी अपघाताचे कारण देऊन गैरहजर असलेल्या राष्ट्रवादीच्या मीना रमेश पाटील यांची यावेळी सभागृहातील उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. भाजपच्या पल्लवी सावकारे यांनी त्यांना सहलीवरून आलो त्या बसमधून हात पकडनूच सभागृहात आपल्या हे विशेष दोन्ही पक्षाने जर या दोन फुटीर सदस्यांना व्हीप बजावले असेल तर त्याचेवर सदस्यत्व अपात्रतेची कारवाई होऊ शकते. आता राज्यात सत्ता महाविकास आघाडीची आहे त्यांनी त्या दोन्ही सदस्यांच्या अपात्रतेबाबत तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. शुक्रवारी जळगाव जि प अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निडवडीसंदर्भात व्यूहरचनेमध्ये महाविकास आघाडी कमी पडली. किंबहुना महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अनुभव कमी पडला. कारण भाजपमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांचे विळ्याभोपळ्याचे नाते असताना ते या निवडणुकीत ते एकत्र आले. एकनाथराव खडसेचे राजकारण संपण्यासाठी गिरीश महाजनांनी त्यांचे आदरातिथ्य तिकीट कापल्याचा आरोप करण्यात आला. तरीसुद्धा जिल्हा परिषदेत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नाथाभाऊनी गिरीश महाजनांशी हातमिळवणी केली अन गिरीश महाजनसुद्धा पक्षासाठी एक पाऊल मागे घेतले हे विशेष होय.अशीही रणनीती महाविकास आघाडीला करणे शक्य होते.

कॉग्रेस राष्ट्रवादीच्या. दोघं सदस्यांना फुटण्यापासून रोखले पाहिजे होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विशेषतः कॅबिनेटपदि नियुक्ती झालेले शिवसेनेचे गुलाबराव पाटलांनी पुढाकार घ्यायला हवे होते. अशा वेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची आठवण येते. आज ते राजकारणात असते तर जळगाव जि प त भाजपला आणले असते असो तरीसुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग जळगाव जि प त  फसला असला तरी एवढ्या कमी कालावधीतसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ राहली  हे आगामी राजकारण्यांसाठी विशेषतः भाजपला शह देण्याच्या राजकारणाची नांदी आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण आता यापुढे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँक जळगाव जिल्हा दूध विकास संघ या निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीतर्फे जोरदार टक्कर देऊ शकते. त्यामुळे आगामी निवडणुका भाजपासाठी सहज आणि सोप्या राहणार नाहीत. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती उपसभापतिच्या निवडणुकीत चाळीसगाव आणि चोपड्यात भाजपला दणका बसलाच आहे. पाचोऱ्यात तांत्रिक कारणावरून म्हणजे महाविकास आघाडीकडे अनुसूचीत  उमेदवारच नसल्याने सभापतिपदी भाजपच्या उमेदवाराची  वर्णी लागली.एकंदरीत जिल्ह्यातील राजकारणात भाजपतर्फे एकनाथराव  खडसे सक्रिय होतील.नाथाभाऊ विरुद्ध महाविकास आघाडी विशेषतः नाथाभाऊ विरुद्ध शरद पवार असे चित्र पहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here