महाविकास आघाडीची बहुमत चाचणी उद्याच !

0

मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, गुरुवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथील सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचं सरकार विधानसभेत उद्या शनिवारी ३० रोजी बहुमत सिद्ध करणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाआघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. परंतु, ही चाचणी आता शनिवारी घेण्याचे ठरले आहे. यासाठी शनिवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. विधानसभेत बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीने १६२ च्या पुढे आपल्या आमदारांची संख्या असून हा आकडा १७० पर्यंत जाईल असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या तरी ही बहुमत चाचणी सहज संमत होऊ शकते. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचं दोन दिवसांचं हंगामी अधिवेशन उद्यापासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.