महाराष्ट्र सैनिकांनो ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईकला तयार राहा

0

मुंबई :- ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा’ असे लिहिलेले पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक करण्याचे ठरविले आहे. येत्या शनिवारी, म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी पाच वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात सभा घेतली जाणार आहे.

भारताने पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केली होती. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत आला होता.त्यातच राज ठाकरे यांनीही ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे राष्ट्रवादी सोबत महाघाडीत येण्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादीकडून मनसेला हिरवा कंदील मिळाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे येत्या शनिवारी राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.