महाराष्ट्र राज्य संजीवनी शेती व शिक्षण संस्थेच्या युवा काव्य पुरस्काराने आकाश महालपूरे सन्मानित

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  विविक्ष क्षेत्रातील समाजासाठी झटणाऱ्या आणि कर्तृत्व उमटवणाऱ्या कार्यविरांचा अद्भुत सन्मान सोहळा संजीवनी शेती व शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्ममाने छत्रपती गुणीजन गौरव महासंमलेन, संगमनेर येथे पार पडले.

 

या संमेलनाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उदघाटक विधानसभा अध्यक्ष प्रमुख नरहरी झिरवाळ, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे, विधान परिषद सदस्य सुधीर तांबे, महाराष्ट्र युवक कांग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, स्वागताध्यक्ष व आयोजक ज्ञानेश्वर सानप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संजीवनी युवा काव्य पुरस्कार २०२१ ने आकाश दिपक महालपूरे, सुप्रसिद्ध लेखक व कवी गोंदेगाव यांना त्यांच्या संजीवनी वर आधारित रचलेल्या काव्यातील साहित्यीक कार्याची दखल घेऊन छत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन संगमनेर – २०२१ या सोहळ्यात मालपाणी सभागृह संगमनेर येथे प्रदान करण्यात आला. आकाश महालपूरे यांना मिळालेल्या या पुरस्काराने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.