कजगाव.ता.भडगांव(वार्ताहर)- येथुन जवळच असलेल्या गुढे येथील भुमिपुत्र मालेगांव शहरातील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ अनिल बाळकृष्ण भोकरे(वाणी)हे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य त्वचारोग तज्ञ संघटनेच्या(आय ए डी व्ही एल असोसिएशन)निवडणूकीत राज्याच्या खजिनदारपदी भरघोस मतांनी निवडून आल्याने त्यांची राज्याच्या खजिनदारपदी निवड झाली आहे.ते यापूर्वी देखील राज्याच्या कार्यकारणी सदस्य म्हणून काम पाहिले आहे त्यांच्या निवडीचे माजी आरोग्य सभापती विकास पाटील व आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.ते येथील सोसायटीचे माजी व्हा.चेअरमन बाळकृष्ण गोविंदा वाणी यांचे सुपुत्र आहेत.