पाचोरा (प्रतिनिधी) : येथे दि. १६ रोजी पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांना महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. निदेशक संघर्ष समितीच्या वतीने तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेणे, याबाबतचे निवेदन देण्यात आले. तसेच याबाबतीत चर्चा करण्यात आली.
लवकरच यासंबधी संपूर्ण महाराष्ट्रातील तासिका कर्मचाऱ्यांचा विचार करून हा विषय आपण मुंबई येथे येत्या वित्तीय अधिवेशनात मा. मंत्री कौशल्य विकास व उद्योजकता यांच्या समोर मांडून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदिप गवळे, शुभम भावसार, घनशाम महाजन, हितेंद्रसिंग पाटील, योगेश महाजन, मनोज पाटील,चेतन पाटील यांचेसह सदस्य उपस्थित होते.