Wednesday, May 18, 2022

महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश मधील चितोडे वाणी यांचे होणार एकत्रीकरण

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

चितोडे वाणी समाज, जळगाव शहरतर्फे आयोजित संवाद समाजाशी वैचारिक बैठक कार्यक्रमात देशातील सर्व चितोडा वाणींनी एकत्रित येऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या सह विविध विषयांवर महत्वपुर्ण ठोस निर्णय घेऊन ठराव करण्यात आले.

- Advertisement -

चितोडे वाणी समाजातील पदाधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय एक दिवशीय मिनी संमेलन – संवाद समाजाशी वैचारिक बैठक जळगाव शहरातील सिल्व्हर पॅलेसच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आली होती. या वेळी जळगाव येथील राजेश यावलकर यांची सर्वानुमते समाजाच्या राज्यस्तरीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

चितोडे वाणी समाजाच्या राज्यस्तरीय वैचारिक बैठकीत पुणे, मुंबई, नशिराबाद, नाशिक, भुसावळ, रावेर, यावल, सावदा, डोंबिवली, बुरहानपूर, वरणगाव, रसलपुर आणि जळगाव येथील उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपआपली मनोगते व्यक्त करुन गावात करीत असलेल्या कार्यक्रमांबद्दल माहिती दिली. जळगाव, वरणगाव, मुंबई आणि बऱ्हाणपूर येथील महिला मंडळाचे सदस्य देखील उपस्थित होते.

तिन्ही राज्यातील समाज बांधवांमधील एकमेकांचे आचार-विचार आणि संस्कृती समजून घेणे, चाली रीती रूढी परंपरा यातील बदल स्वीकारण्याची भावना असणे आणि त्या नंतर व्यापाराचा आदान-प्रदान करून आचार विचार आणि मन जुळल्यानंतर  तरुण पिढी विवाहास तयार होईल आणि समाज एकत्रीकरण उद्देश साध्य होईल.

सर्वांना विश्वास आहे की, एकत्रीकरणामुळे लग्न होतील. पण सामाजिक एकत्रीकरण आणि विवाह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हेही खरे आहे.  जसा समाज एकत्र येईल, लग्नाचे बंधन असेल, लग्नाचे बंधन असेल तेव्हा आपण एकत्र येऊ.आज समाजात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

‌भविष्यात समाजाचे सर्वार्थाने अस्तित्व टिकविणे आवश्यक आहे.  अन्यथा “महाराष्ट्रातील चितोडे वाणी, मध्यप्रदेशातील चित्तोडा, नागर चितोडा समाज, राजस्थानातील वैश्य चितोडा” इत्यादी सर्व प्रकारचे वाणी/ बनिया इतिहासाच्या पानांवरच राहतील.

सर्व चितोडा समाजाचे एकीकरण करण्यासाठी राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र येथील चितोडा वाणी समाजातील विविध गावांच्या पदाधिकाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस इंदोर येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनात महाराष्ट्र मधील वाणी समाज बांधवांनी उपस्थित राहून एकत्रीकरण करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे हा देखील निर्णय घेण्यात आला.

भारतात एकच मोठा चितोडा वाणी समाज असावा, त्यांची एकच जात असावी, हा समाज एकत्र यावा, या समाजाचे विविध संमेलने व्हावीत, रोटी बेटी व्यवहार व्हावा, विवाह बंधने व्हावीत हा हेतू ठेऊन हा राज्यस्तरीय संवाद समाजाशी हा कार्यक्रम जळगावी आयोजित करण्यात आला असल्याचे जळगाव चिवासचे अध्यक्ष प्रा. उमेश वाणी यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले.

सर्वानुमते मंजूर झालेले ठराव

१) अखिल भारतीय स्तरावर समाजाचे एकीकरण करणे.

२) महाराष्ट्रातील चितोडे वाणी समाजाची जनगणना करणे.

३)प्रत्येक गावातील कार्यकारणीत १८ ते २५ वयोगटातील किमान दोन व्यक्तींना स्थान देणे.

४)सीसीसीआयए बाबत समिती तयार करणे.

५) विवाह समारंभातील अनाठायी खर्च टाळण्यात यावा आणि वेळेवरच लग्न लागले पाहिजे.

६) कोणाच्याही मृत्यु नंतर त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांनी १० किंवा ११ दिवस शोक पाळण्याऐवजी तीन दिवसांनी शोक सभा/बैठक आयोजित करण्यात यावी, परिवारातील सदस्यांचे सांत्वन करण्यात यावे.

६) अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधीनींची श्री राजेश यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मुख्य आणि विविध उपसमिती गठीत करणे.

७) समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक बळकटीकरण आवश्यक आहे .

इत्यादी ठोस निर्णय घेण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनघा खारुळ व वंदना गडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी  एस. के. वाणी,  अरुण नंदर्षी, अनिल नंदर्षी यांनी वडीलकीच्या नात्याने मार्गदर्शन केले.  आभार प्रदर्शन श्रीकांत मोतीलाल वाणी यांनी केले.

वैचारिक बैठक यशस्वीतेसाठी विनोद अजनाडकर, प्रकाश पाटील, संजय यावलकर, शेखर अकोले, सुयोग यावलकर, अरुण वाणी, प्रशांत अकोले, डॉ. नितीन वाणी, अनिल अकोले, विलास वाणी, अँड. मंजू वाणी, विनायक अट्रावलकर, शुभांगी यावलकर यांनी परिश्रम घेतले. तसेच जळगाव येथील सुनील रामदास वाणी यांनी प्रोजेक्टरद्वारे बैठक प्रसारित करणेसाठी सक्रिय सहकार्य करून मनोगत व्यक्त केले. या वैचारिक बैठकीस

वरणगाव येथून अनंत गडे, नरेंद्र वाणी, सतीश नवलखे आणि चंचल श्रावगे, महेश गोडबोले आणि ज्योती गोडबोले यावल येथील सुनील श्रावगी, डोंबिवली येथील अनिल नंदर्शी आणि सुधा नंदर्षी, भुसावळ येथून प्रकाश बडछापे, संजय यावलकर, नाशिक येथून परेश सांगवीकर,  पुणे येथील मनोज वाणी, स्वप्नाली वाणी, दीपक वाणी आणि धीरज पाटील,  बऱ्हाणपूर येथून संजय वाणी, चंदुलाल पितळे, प्रमोद गडे आणि अंजली गडे,  रावेर येथील कैलास वाणी प्रशांत श्रावक, महेश अत्रे आणि उदयकांत वाणी, बदलापूर येथून विपिन कुमार श्रावगी,  नशिराबाद येथील मंगलदास श्रावगी आणि अश्विन श्रावगी आदी मान्यवर उपस्थित होते.  तसेच डोंबिवली येथून अविनाश खारुळ तर पुणे येथील द्वारकानाथ खरे यांनी ऑनलाइन पध्दतीने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या