Thursday, September 29, 2022

महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जळगाव जिल्हा कार्यकारणीची महाबैठक उत्साहात

- Advertisement -

– प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांच्यासह जिह्ल्यातील माळी समाजातील प्रमुख लोकांची बैठकीला उपस्तिथी

- Advertisement -

पाचोरा :- महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जळगाव जिल्हा कार्यकारणीची महाबैठक दि ७ रोजी राजीव गांधी टाऊन हॉल, पाचोरा येथे मोठया उत्साहात संपन्न झाली. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता. जळगाव जिह्ल्यात राजकीय क्षेत्रात माळी समाजाचा टक्का वाढविण्यासाठी समाजातील तळागाळातील माळी समाज बांधवांची संघटन बांधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हा पदाधिकारी व समाजातील काही प्रमुख लोक करत आहेत. माळी समाजावर सर्व राजकीय पक्ष नेहमीचं अन्याय करत आहे.  जिह्ल्यात माळी समाजाची प्रत्येक मतदार संघात निर्णायकारक लोकसंख्या आहे. तरी सुद्धा जळगाव जिह्ल्यात माळी समाजाचा एकही आमदार – खासदार हा का नाही ? हे माळी समाजाचे दुर्दैव आहे. यासाठी आप-आपसातले हेवे-दावे, स्थानिक वाद-विवाद बाजूला सारून समाजाने एकत्र येणे हि काळाची गरज आहे असा सर्वांचा सुरु होता.

- Advertisement -

- Advertisement -

प्रदेश अध्यक्ष, अनिल महाजन यांनी यांच्या भाषणात बोलतांना सांगतिले की, समाज संघटन हाच विकासाचा पाया आहे. अगोदर आपले योग्य पद्धतीने समाज संघटन करा एकत्रित या तळागाळातील समाज बांधवाच्या संकटकाळी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी धावूंनजा  समाजातल्या प्रत्येक माणसा सोबत आपुलकीचा जिव्हाळा निर्माण करा.त्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हा. जिह्ल्यात विखुरलेल्या माळी  समाजाला एकत्र करा. महात्मा जोतिबा फुले व सवित्रीबाई फुले यांचे विचार समाजामध्ये रुजवा. फुलेंच्या विचारांचा समाज घडवा. जिह्ल्यातील राजकीय पुढाऱ्यांनी माळी समाजाला कमी लेखू नये. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत माळी समाजाचा विचार करणाऱ्या पक्षालाच समाजचे मतदान मिळेल. तसेच भाजपा सरकारने माळी समाजाला अतुलजी सावे यांच्या रूपाने प्रतिनिधित्व दिल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे अनिल महाजन यांनी अभिनंदन केले.

पाचोरा येथे महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारकाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तो स्थानिक प्रशासनाने तात्काळ मार्गी लावावा. तसेच समाज हिताचे ठराव  एकमताने पास करण्यात आले. जळगाव जिह्ल्याकडे समाज संघटनेसाठी अधिक लक्ष देणार व जिह्ल्यात महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे कॅडर तयार करून कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण देणार व सर्व कॅडर बेस कार्यकर्ते जिह्ल्यासह महाराष्ट्र भर तयार करणार. असे यावेळी  प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांनी  बोलताना सांगितले. या महाबैठकीचे सूत्रसंचालन रमेश सोनावणे यांनी केले.

अनिल महाजन (प्रदेश अध्यक्ष), डी. पी. माळी (प्रदेश कार्याध्यक्ष), प्रवीण महाजन (प्रदेश संघटक), डी. बी. महाजन (विभागीय अध्यक्ष), काशिनाथ जाधव (विश्वस्त) रमेश सोनवणे (जिल्हाध्यक्ष,जळगाव),विठ्ठल महाजन,उध्दव महाजन,अशोक खलाने, सागर महाजन,आप्पा महाजन,भीमराव खलाने,अरुण माळी,गोरख महाजन, संतोष महाजन, कैलाश महाजन, शिवाजी महाजन,भूषण महाजन डॉ.रवींद्र महाजन, प्रभाकर महाजन,योगेश सपकाळ, गोरख महाजन, आप्पा महाजन,जगदीश महाजन, भास्कर महाले,के एस महाजन, अमृत बनकर,खुशाल अहिरे, मुकुंदा महाजन,अरुण माळी, भिमराव खलाने, विकास महाजन,कैलास माळी,अमोल महाजन, भूषण महाजन,रोहित महाजन, नाना पंढरीनाथ महाजन, समाधान महाजन,राकेश महाजन व इतर समाज बांधव उपस्थित होते. खालील महासंघाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व ज्येष्ठ लोक उपस्तिथ होते. अतिशय खेळी मेळीच्या वातवरणात बैठक संपन्न झाली. शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली..

नवंनियुक्त पदाधीकारी

डॉ.रवींद्र महाजन(वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष जळगाव), प्रभाकर महाजन (जळगाव  महानगर ,जिल्हा अध्यक्ष), योगेश सपकाळ (औरंगाबाद,जिल्हा अध्यक्ष), गोरख महाजन (जिल्हा उपाध्यक्ष), आप्पा महाजन (जिल्हा कार्याध्यक्ष), जगदीश महाजन (शहर अध्यक्ष,चाळीसगाव), भास्कर महाले (जिल्हा सचिव,जळगाव), के. एस. महाजन (जिल्हा कार्यकारिणी सदस्य),अमृत बनकर (जिल्हा सहसंघटक), खुशाल अहिरे (जळगाव जिल्हा,प्रसिद्धी), मुकुंदा महाजन (जिल्हा सचिव), अरुण माळी (जळगाव जिल्हा उपाध्यक्ष), भिमराव खलाने (उपाध्यक्ष,चाळीसगाव), विकास महाजन ( उपाध्यक्ष भडगाव), कैलास माळी(उपाध्यक्ष,बोधवड), अमोल महाजन (पाचोरा युवक आघाडी शहर संघटक), भूषण महाजन (जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष), रोहित महाजन (पाचोरा युवक अध्यक्ष),नाना पंढरीनाथ महाजन (पाचोरा तालुका अध्यक्ष), समाधान महाजन (जिल्हा उपाध्यक्ष युवक), राकेश महाजन (प्रसिद्धी प्रमुख सोशल मीडिया पाचोरा) व इतर नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवड करण्यात आल्या व सर्वाना शुभेच्छा ही देणयात आल्या.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या