भडगाव :- माळी समाजाचे अधिकृत व्यासपीठ महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन व सर्व विश्वस्त मंडळाच्या आदेशाने महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय आढावा महाबैठक दि ९ जून रविवार रोजी दु ०१:३० वाजता लोणावळा येथे आयोजित करण्यात आली आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकित एक सामाजिक संघटन म्हणून महासंघाची काय भूमिका असली पाहिजे त्यावर चर्चा करणयात येणार आहे व प्रत्येक मतदारसंघात माळी समाजाचे मतदान हे निर्णयाकारक आहे. याचे राजकीय समीकरण कसे असले पाहिजे व विधानसभेच्या निवडणुकीत माळी समाजातील उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे राहतील त्या त्या ठिकाणी महासंघाचे कसे नियोजन असले पाहिजे व त्या माळी उमेदवाराला कशी मदत करायची या बाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच त्या उमेदवाराचे सामाजिक योगदान काय ? समाज कार्यात त्याचा सहभाग किती आहे या सर्व विषयाबाबत या महाबैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे संघटन ज्या भागात तालुक्यात किंवा जिल्ह्यात कमी असेल त्या त्या ठिकाणी संघटनात्मक बदल करणे बाबत व नवीन युवकांना संधी देण्याबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या आघाड्या स्थापन करण्यात येणार आहेत उदा. डॉक्टर ,वकील,कुस्तीपटू,सांस्कृतिक, कर्मचारी,अधिकारी ,आघाडी आशा प्रकारच्या अनेक आघाड्या स्थापन करण्यात येणार आहेत. महासंघाचे काम न करणाऱ्या व महासंघाच्या कार्यक्रमांना वेळ न देणाऱ्या लोकांना नारळ श्रीफळ देऊ पदमुक्त करण्यात येईल व त्यांच्या जागी नवीन लोकांना संधी देण्यात येईल तसेच झोन प्रभारी ही नियुक्त केले जाणार आहेत.
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकित वेगवेगळ्या पक्षाकडून किंवा अपक्ष माळी समाजातील राज्यभरात किती उमदेवर इच्छुक आहेत व एक समाज म्हणून आपण त्यांना काय मदत करू शकतो व त्यांचे समाजात, समाज कार्यात काय योगदान आहे हे तपासून महाराष्ट्र माळी समाज महासंघ सर्वांच्या विचाराने यांना कशी मदत करायचे ते रणनीती या बैठकित आखनार आहे या साठी महासंघाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या महाबैठकिस उपस्तीत राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.