Tuesday, August 16, 2022

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त शस्त्र प्रदर्शन

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगाव:-  महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त मंगळवार दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी काव्यरत्नावली चौक जळगाव येथे जळगाव जिल्हा पोलीस दल, युवाशक्ती फाउंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्र, बिनतारी संदेश यंत्रणा, श्वान पथक, बंद पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक इत्यादी पोलीस वापरात असलेल्या यंत्रणेचे प्रदर्शन आयोजीत करण्यात येणार आहे.

नागरिक व पोलीस विभागामधील संवाद वाढावा हा या मागचा मुख्य उद्देश आहे. प्रदर्शनचे उदघाटन मंगळवारी सकाळी १०.०० वाजता पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या वेळी पोलीस दलातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत व या सह विविध शाळेतील विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देतील. या विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीती जास्त कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून प्रदर्शनाला भेट द्यावी असे आव्हान जळगाव जिल्हा पोलीस दल, युवाशक्ती फाउंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या