फैजपूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती गृप,दिपाली गृप्स अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते फैजपूर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक श्री.प्रकाश वानखेडे साहेब व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पोलीस हे महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी एक महत्वपूर्ण व निष्पक्ष संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून प्रत्येक संकटकाळात जिवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सर्वप्रथम धावून येतात ते फक्त पोलिस बांधवच असे प्रतिपादन नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे.जनतेची सेवा हेच परम कर्तव्य आहे असे समजून प्रत्येक पोलीस कर्मचारी हा रात्रंदिवस कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो असे प्रतिपादन यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे साहेब यांनी केले.