महाराष्ट्र कबड्डी संघ निवड चाचणीसाठी बहादरपूर येथील हर्षाली मोरेची निवड

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील हर्षली संजय भोई हीची कुमार गट महाराष्ट्र कबड्डी संघ निवड चाचणी पनवेल येथे निवड करण्यात अली आहे,

सविस्तर वृत्त असे की, सदर निवड चाचणी तुन महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे,पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील बद्रीनाथ क्रिडा मंडळाची  खेळाडू हर्षाली भोई ईची निवड झाली त्या बद्दल प्रा. संजय भावसार (उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक )यांनी तिचा सत्कार व अभिनंदन केले बहादरपूर सारख्या छोट्या गावातून तिची निवड झाल्या मुळे तिचे कौतुक होत आहे बहादरपूर सारख्या ग्रामीण भागातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जातात यासाठी बद्री स्पोर्ट रोज संध्याकाळी तीन तास गावातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मारुती मंदिर येथील ग्राउंडवर प्रॅक्टिस देतात या खेळाडूस मंदार लोकांक्षी दिनेश चौधरी, भूषण सोनार यांनी मार्गदर्शन केले या वेळेस सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चौधरी , संजय मोरे, भूषण सोनार, मंदार लोकांक्षी व खेळाडू उपस्थित होते तसेच

नितीन बर्डे सर सचिव जिल्हा कबड्डी असोसिएशन चैत्राम पवार सुनील राणे आनंद महानगडे हितेश सोनी हरीश शेळके  दीपक वालडे यांनी सुद्धा  तिचे अभिनंदन केले. बहादरपूर सारख्या ग्रामीण भागातील खेळाडूची महाराष्ट्र कबड्डी संघावर निवड व्हावी यासाठी गावातील अनेक खेळाडूंनी तरुणांनी तिला शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here