बेंगळूरु : महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा कर्नाटकच्यापोलिस महासंचालकांनी दिला आहे. यावेळी रेल्वेना लक्ष्य केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे मुंबईसह राज्यभरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
कर्नाटकच्या पोलिसांना एका व्यक्तीने फोन करून ही माहिती दिली आहे. यामध्ये त्याने कर्नाटक, महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये हल्ला करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तामिळनाडूच्या रामनाथपूरममध्ये 19 दहशतवादी जमले असल्याचा दावाही त्याने केला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा असलेल्या मुंबईमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ही माहिती ट्रक चालक स्वामी नाथा पूरम यांनी दिली आहे.