महाराष्ट्रावर लोडशेडिंगचं संकट? महानिर्मितीकडे 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा..

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पावसामुळे कोळशाची प्रचंड मोठी टंचाई  निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्रावर आता विजेचे संकट येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. महानिर्मितीकडे 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. वेगवेगळ्या औष्णिक केंद्रावरचे पाच संच कोळसा अभावी बंद झाले आहेत. त्यामुळे राज्यासमोर पुन्हा एकदा लोडशेडिंगचं संकट  उभ ठेपलं आहे. औष्णिक केंद्रांवरचे पाच संच कोळसा अभावी बंद कोरडी औष्णिक केंद्राचे 620 मेगावॅटचे युनिट 6 बंद, चंद्रपूर युनिट 4 बंद, नाशिक  युनिट 5 बंद, खापरखेडा युनिट 1 आणि 2 हे सर्व संच आपत्कालीन परिस्थितीत बंद वेकोलीकडून महानिर्मिती 25 रॅक ऐवजी 18 रॅक कोळसा पुरवठा होत होता.

आता तो 10 रॅकपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील सात ऊर्जानिर्मिती केंद्रावरील वीज निर्मिती प्रभावित झाले आहे. सततच्या पावसामुळे कोळसा उत्खनन बंद असून राखीव साठा संपत आल्याने हे संकट निर्माण झाले आहे. राज्यात एकूण सात सात केंद्रांवर वीज निर्मिती होते.

यामध्ये चंद्रपूर, खापरखेडा, परळी, भुसावळ, नाशिक आणि पारस या सात केंद्रांचा समावेश आहे. राज्यातील आजची विजेची मागणी – 20,243 मेगावॅट, आज निर्माण होणारी वीज- 11,743 मेगावॅट, महावितरणची मागणी- 17333 मेगावॅट, महानिर्मितीचा पुरवठा- 5003 मेगावॅट, इतर कंपनी कडून पुरवठा- 6740 मेगावॅट, केंद्र सरकार कडून पुरवठा- 8507 मेगावॅट, महानिर्मितीकडे 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे दोन दिवसांत कोळशाचा साठा उपलब्ध न झाल्यास राज्यावर लोडशेडिंगचं संकट निर्माण होऊ शकतं. या संदर्भात अद्याप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये.

 कुठे किती कोळसा उपलब्ध 

खापरखेडा केंद्र – 0.5 दिवस पुरेल इतका कोळसा उपलब्ध, कोराडी – 2 दिवस पुरेल इतका कोळसा उपलब्ध, नाशिक – 1.5 दिवस पुरेल इतका कोळसा उपलब्ध, परळी – 1.75 दिवस पुरेल इतका कोळसा उपलब्ध, भुसावळ – 1 दिवस पुरेल इतका कोळसा उपलब्ध, चंद्रपूर – 1.5 दिवस पुरेल इतका कोळसा उपलब्ध, पारस – 1.25 दिवस पुरेल इतका कोळसा उपलब्ध, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोळशा निर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोळशाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here