Sunday, May 29, 2022

महाराष्ट्राला हुडहुडी.. राज्यात पुढील दोन महिने गुलाबी थंडी

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

- Advertisement -

मागील आठवडाभरापासून राज्यात गुलाबी थंडी पडली आहे. त्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर 8 ते 9 अंशांपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर ऊबदार कपडेही कपाटाबाहेर काढून वापरात आलेत.

- Advertisement -

अवकाळी पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे यंदा राज्यात गुलाबी थंडीचं जरा उशिराच आगमन झालं. पण आता ही थंडी 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात कायम राहणार आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव पुढचे दोन महिने तुम्हा आम्हाला घेता येणार आहे. त्यात आज आणि उद्या तापमानाचा पारा आणखी घसरण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.

21 फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर आताच 8 ते 9 अंशांपर्यंत खाली आलं आहे.

त्यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर ऊबदार कपडेही कपाटाबाहेर काढून वापरात आलेत. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील 48 तासात थंडीचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागातील तापमान 8-9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या