मुंबई : देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात महाराष्ट्रात आज कालपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1 हजार 362 रुग्णांची वाढ झाली असून राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 18 हजार 162 वर गेलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात करोनाच्या केसेस वाढत आहेत, मात्र काळजीचं कारण नाही. आपल्याला अधिक सतर्क रहावं लागेल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सर्वसाधारण परिस्थिती पाहिली, तर आजही करोनाचा प्रादुर्भाव हा नियंत्रणात आहे.
महाराष्ट्रात आपण २ लाखापर्यंत चाचण्या केल्या आहेत. तसंच चाचणी करण्याची केंद्रही वाढवली आहेत. सुरुवातीला १ केंद्र होतं ही संख्या आता ६१ वर गेली आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला.