महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार, ‘या’ महत्वाच्या गोष्टींची आधीच पूर्तता करून घ्या

0

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एवढेच नाही तर कोरोनामुळे रोज मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील चिंताजनक आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार लॉकडाऊन लावण्याचा विचार पक्का केला आहे. हा लॉकडाऊन 8 दिवसांचा असेल की 15 दिवसांचा याबाबत देखील अजून निश्चिती नाही. मात्र लॉकडाऊन लागण्याच्या पूर्वी आधी कल्पना दिली जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच लॉकडाऊन लागण्याच्या पूर्वी कोणत्या गोष्टींची पूर्तता करणे महत्वाचे आहे याची माहिती करून घेऊया…

1) जीवनावश्यक वस्तू

लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधी जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करून घ्यावी. लॉकडाऊनच्या काळातही जीवनावश्यक वस्तू ह्या सुरू ठेवण्याची पूर्ण शक्यता आहे. मात्र त्या वेळेला काही ठिकाणी साठेबाजी करण्यात आल्याची उदाहरणे समोर आहेत. याशिवाय लॉकडाउन काळात बाहेर न पडणे हेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे आधीच जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करून घ्या.

2) औषध आणि प्रथमोपचार साहित्य

काही घरांमध्ये लहान मोठे आजार असलेले लोक असतात. आजारपण तेवढं मोठं असेल तर प्रशासन लॉकडाऊनमध्येही रुग्णालयात जायला परवानगी देईल, मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी तसेच औषधांसाठी बाहेर जायला लागू नये यासाठी काळजी घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने अशी औषधं घरात ठेवा जेणेकरुन गरजेच्या वेळी बाहेर पडण्याची वेळ येणार नाही. तसेच प्रथमोपचार पेटी देखील या काळात जवळ असणे आवश्यक आहे.

3) बँक आणि सरकारी कार्यालयाची कामे उरकून घ्या

बँक किंवा सरकारी कार्यालयांमधील कामे उरकून घ्या. नंतर ही काम करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. शक्य तेव्हा ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. मात्र मोठी एखादी रक्कम आपल्याला बँकेतून काढायची गरज असल्यास ती लॉकडाउन होण्यापूर्वीच काढून घ्या. बॅंकचे मोठे काम करायचे असल्यास आधीच करून घ्या.

4) बाहेर गावी जाणार किंवा प्रवास करणार असाल तर काळजी घ्या

जरी लॉकडाऊन लागले तरी त्यामध्ये वाहतूक व्यवस्था कशा प्रकारे सुरू ठेवण्यात येतील यावर अद्याप काही सांगता येणार नाही. मात्र जर तुम्ही प्रवास करणार असाल तर लॉकडाऊन पूर्वी करा. शक्यतो गरज असेल तरच प्रवास करा. अन्यथा करू नका. कोरोनाच्या काळात प्रवास टाळावा. जिथे आहात तिथेच सुरक्षित रहा. प्रवासापूर्वी गाड्यांची परिस्थिती काय आहे याची खात्री करून घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा गर्दी करू नका. सोशल डिस्टंसिंग चे पालन करा.

5) वर्क फ्रॉम होम आणि अत्यावश्यक सेवांमध्ये करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं

लॉकडाऊनच्या काळामध्ये बहुतांशी वर्क फ्रॉम होम सरकार करायला लावणार असल्याची शक्यता आहे.त्यामुळे इंटरनेट कनेक्शन आणि कामासाठी लागणाऱ्या इतर साहित्याची जमवाजमव आधीच करून घ्या. मात्र जे व्यक्ती अत्यावश्यक सेवांमध्ये काम करतात. किंवा ज्यांना कामासाठी बाहेर जाणं गरजेचं असतं त्यांनी ओळख पत्र जवळ बाळगणे महत्त्वाचे आहे.

6) सरकारी सूचना समजून घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका

सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या सूचनांच्या बाबत माहिती नीट समजून घ्या. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. नियमांचे पालन करा. आपण कोणत्याही कारवाईसाठी पात्र होणार नाही याची काळजी घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.