महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन? मंत्री वडेट्टीवारांचे संकेत

0

मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सूतोवाच विजय वडेट्टीवार यांनी केले.

 

राज्यात भविष्यात संपूर्णत: लॉकडाऊन करावाच लागणार आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेवरही निर्बंध आणावे लागतील. कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही कितीही उपाययोजना केल्या, तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर कमी पडतील, नर्स कमी पडतील हे आणणार कुठून. जी व्यवस्था, आता साडे पाच हजार डॉक्टर अंतिम परीक्षा पास होतील, त्यांना आम्ही कामाला लावतो. पीजी वाल्या विद्यार्थ्यांचीही सेवा आम्ही घेणार आहोत. आपल्याकडे यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळेच, विकेंडऐवजी कडक लॉकडाऊनची विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे आपत्ती व विजय वडेट्टीवार यांनी सांगितल.

 

राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय महाराष्ट्रात आपण निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. कारण, राज्यात कोविडचा स्पेड झालेला आहे. त्यामुळेच, आज तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, असे वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 शी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे, लवकरच राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.