महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा गेला २८०० च्या वर

0

मुंबई ।  देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. महाराष्ट्रात दररोज करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २ हजार ६८४ इतकी होती मात्र यात आणखी भर पडून ही संख्या २ हजार ८०१वर जाऊन पोहोचली आहे. काल रात्रीपासून ११७ रुग्ण वाढले आहेत. गेल्या १२ तासात नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील ६६, पुण्यातील ४४, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

कोरोनाने सर्वात जास्त उपद्रव मुंबईत आणला आहे. आज आढळलेल्या ६६ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्यानंतर मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजार ८२२ इतका झाला आहे. वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यासोबत महाराष्ट्रातील कोरोनाच संकट आणखी गडद होत चाललं आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाचे दुसरे हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात गेल्या १२ तासात २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा एकूण आकडा आता ३९  झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.