मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या आकड्यांचे नवीन रेकॉर्ड होत आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 9518 रुग्ण आढळून आले आहेत. तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3,10,455 एवढी झालीय. तर मृत्यूचा आकडा 11 हजार 854 वर गेला आहे. दरम्यान, २४ तासात 3906 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 1,28,730 Active रुग्ण आहेत.
काल रविवारी मुंबईत 1038 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतल्याच एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 388 एवढी झाली आहे. आज मुंबईत 64 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची मृत्यूसंख्या ही 5714 वर गेली आहे.
तर देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच कोरोनावरच्या लशींच्या संशोधनातही प्रगती झाली आहे.

