महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या बसेसवर बंदी

0

मुंबई : गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. भारतातील सुरुवातीच्या महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य या साथीचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. 2021 च्या सुरूवातीस, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या घटनांमध्ये घट झाली होती. मात्र,मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनोने पुन्हा एकदा डोके वर काढले. यावेळीसुद्धा महाराष्ट्रातच कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे आहेत. मध्य प्रदेश सरकारकडून महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता 20 मार्चपासून महाराष्ट्रात ये-जा करणार्‍या प्रवासी बसेसची हालचाल थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गुरुवारी मध्य प्रदेशात 917 नवीन कोरोनाचे रुग्ण

नव्या आकडेवारीनंतर राज्यात एकूण संक्रमित लोकांची संख्या 2 लाख 71 हजार 957 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या सहा हजाराहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या हजारो घटना समोर येेेत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात 25 हजार 833 कोरोना संसर्गाची नोंद झाली. महाराष्ट्रात झपाट्याने पसरलेल्या कोरोनाचा विचार करता अनेक राज्यांनी येथून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी कोरोनो चाचणीही अनिवार्य केली आहे. गुरुवारी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री सीएम शिवराजसिंह चौहान यांनी बैठकीत मोठा निर्णय घेत 20 मार्चपासून महाराष्ट्राातून येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवासी बसेस थांबविण्याचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, प्रवासी त्यांच्या वैयक्तिक वाहनांमधून येऊ शकतात. हे किती काळ टिकेल? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असू शकते, त्यात महाराष्ट्राची परिस्थिती झपाट्याने खालावत चालली आहे आणि यामुळे मध्यप्रदेशात कोरोना संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे. हे लक्षात घेऊन प्रवासी बसेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यातील अधिकााऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.