नवी दिल्ली :- नरेंद्र मोदी यांनी काल दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह ५८ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात महाराष्ट्रातील सात शिलेदारांचा समावेश आहे. चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदं महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत. त्यात कुणाला कुठलं खातं मिळतं, कुणाला नवं मंत्रालय मिळतं, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, ‘मोदी सरकार १’ मध्ये महाराष्ट्राकडे जी खाती होती, तीच ‘मोदी 2 मध्येही कायम राहिली आहेत.
कॅबिनेट मंत्री
– नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
– अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्री
– पियुष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री
– प्रकाश जावडेकर – पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यमंत्री
– रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
– संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री
– रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री