मुंबई: राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. दरम्यान, राज्यात लागू असलेली महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट अखेर मागे घेण्यात आली आहे. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या बळावर सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.