नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५७ खासदारांनी मंत्रिपदांची शपथ घेतल्यानंतर लगेचच खाते वाटप करण्यात आले. दरम्यान नव्या सरकारकडून विविध राज्यांमधील राज्यपाल बदलण्याची किंवा नवे राज्यपाल नियुक्त करण्याची शक्यता आहे. यातच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राचं राज्यपाल करावं, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा आहे. सुमित्रा महाजन यांना इंदूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे इंदूरमधून भाजपने उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई केल्यानं, स्वत: सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले होते. आता सुमित्रा महाजन यांचे नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आल्याने महाराष्ट्रातही आनंदाचं वातावरण दिसून येत आहे.