महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ संपवण्याचा डाव आहे का? ; बाळासाहेब थोरात

0

मुंबई : पुण्यात एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाविषयीचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA ) देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तीव्र विरोध होता. त्यांनी तो बोलूनही दाखवला होता. तरीही कायद्यानुसार ठाकरे सरकारने NIA कडे तपास सोपवला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडं (एनआयए) देण्याचा केंद्राचा निर्णय काळजी वाढवणारा आहे. दलित व आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव तर नाही ना,’ अशी भीती महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

एल्गारच्या तपासावर बोलताना थोरात पुढे म्हणाले की, ‘एल्गार परिषदेचं व्यासपीठ पुरोगामी लोकांचं होतं. तिथं कुणी वेगळं वागलं असेल. त्याबद्दलचा काही पुरावा असेल तर आम्ही त्यांची बाजू घेणार नाही. मात्र, जे कवी, विचारवंत होते. त्यांनी काही पुरोगामी विचार मांडला. त्यांची चौकशी करणं चुकीचं आहे,’ असं थोरात म्हणाले. ‘महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. एल्गारच्या निमित्तानं महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ संपवण्याचा डाव आहे का? संपूर्ण आंबेडकरी, दलित चळवळीलाच नक्षलवादी ठरवण्याचा डाव आहे का?, अशी चिंता वाटते. या प्रकरणाचा तपास एनआयएकडं देण्याची काळवेळ पाहिली तर संपूर्ण समाज, राज्य आणि देश या प्रकरणाकंड संशयानं पाहतोय’, असंही त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.