Thursday, September 29, 2022

महाराष्ट्रातील एकमेव ग्रीन झोन जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव !

- Advertisement -

गडचिरोली :  कोरोना’ प्रादुर्भावापासून दूर राहिलेला विदर्भातील एकमेव जिल्हा गडचिरोलीतही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई आणि पुण्याहून आलेल्या तिघा जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे.

- Advertisement -

एकाच वेळी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर गडचिरोली जिल्हा ग्रीनमधून ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. मुंबई-पुण्याहून आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या तिघा नागरिकांची तपासणी केल्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.

- Advertisement -

- Advertisement -

राज्यात आणि जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना आपली गावी जाण्यास मुभा मिळाली. परंतु, जी लोकं गावी परतली आहे.  प्रवास करून गावी पोहोचलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या गडचिरोली जिल्ह्यातही काही नागरिक हे बाहेरून आले होते. खबरदारी  म्हणून प्रशासनाने या लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन केलं होतं. त्यानंतर त्याचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. आज क्वारंटाइन केलेल्या तीन जणांचा कोविड- 19 चा अहवाल रविवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

यामध्ये कुरखेडा येथील वेगवेगळया दोन क्वारंटाइन सेंटरचा व चामोशीमधील एका क्वारंटाइन सेंटरचा समावेश आहे. संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण वार्डमध्ये हलविण्यात आले आहे. संबंधित रूग्णांकडून त्यांच्या प्रवासाची तपशील घेणे सुरू आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या