जळगाव (प्रतिनिधी) : नाशिक विभागातील जळगाव, धुळे अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी आहेत, लघुउद्योजकांच्या तर प्रचंड अडचणी आहेत. जळगाव जिल्ह्यात एमआयडीसीतील उद्योगांची स्थिती फारसी चांगली नाही. त्यामागे कामगारांच्या आहेत काय? शासकीय स्तरावर अडमुठे धोरण आहे का? त्याचा अभ्यास करून त्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरचं असून ते काम मी प्रामुख्याने नाशिक विभागाचा अध्यक्ष म्हणून करत असल्याचे प्रतिपादन उद्योजक संजय दादलिका यांनी केले.
मूळ चाळीसगावचे असलेले संजय दादलिका यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या नाशिक विभागीय कार्याललयाच्या अध्यक्षपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली. त्या पाश्वभूमीवर संजय दादलिका यांनी दै. लोकशाहीच्या लोकलाईव्ह चॅनेलला दिलेल्या खास मुलाखतीत आपले विविध मुद्यांवर विचार व्यक्त केले.
22 वर्षापूर्वी चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेत सक्रीय असलेले संजय दादलिका मध्यंतरी पारिवारिक, व्यक्तीगत आणि राजकारणाच्या अडचणींमुळे त्यापासून दूर झाले होते. काही वर्षे काँग्रेस पक्षात ते सक्रीय होते. तथापि मूळ पिंड व्यापारी, शेतकरी आणि उद्योजकांचा असलेले दादलिका राजकारणात रमले नाहीत. म्हणूनच पुन्हा ते व्यापारी, उद्योजक, शेतकर्यांची प्रतिनिधीत्व करणार्या चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेत सक्रीय झाले आहे.
दिड महिन्यापूर्वी नाशिक विभागाचे अध्यक्ष हे जळगावी येवून उद्योजकांची बैठक घेऊन संजय दादलिका यांचेकडे नाशिक विभागाची धुरा सांभाळण्याचे आवाहन केले त्यानुसार गेल्या आठवड्यात नाशिक कार्यालयाच्या अध्यक्षपदाची रितसर सूत्रे घेतली.
चेंबरचे विभागाय अध्यक्ष म्हणून तुम्ही कोणते कार्य करण्याची इच्छा आहे. तुमचा उद्देश काय आहे? याबाबत दादलिका यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शेती हा भारताचा आहे. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करून त्याच्या मालाला चांगला भाव देऊन व्यापार्यांना सुद्धा चांगला नफा कसा मिळेल या दृष्टीने शेतकर्यांमध्ये जनजागृती करून शासनाच्या असलेल्या अनेक योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचा माझा संकल्प राहिल.
मॅग्नेट ऑफ इंडस्ट्रीज असे संबोधणार्या उद्योजक वालचंद हिराचंद यांनी 1927 साली चेंबरची ज्या उद्देशाने केली तो उद्देश सफल करण्याचा प्रयत्न राहिल. येत्या दोन वर्षात नाशिक विभागातील उद्योजक, व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चैतन्य निर्माण करण्याचा माझा प्रयत्न राहिल त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेऊन जनजागृती केली जाईल. सदस्य संख्या वाढविण्यात येईल. व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्या समस्या शासनदरबारी सोडविण्यासाठी चेंबर दुवा म्हणून कार्य करेल. त्यासाठी चेंबरला साथ मिळेल असा विश्वास संजय दादलिका यांनी व्यक्त केला.