महाराष्ट्राच्या सर्वांगिन विकासात राज्य परिवहन महामंडळाचा महत्त्वपूर्ण वाटा-अँड.आशा शिरसाट

0

चाळीसगाव: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चाळीसगाव आगारातर्फे सुरक्षितता मोहीम 2021या मासिक कार्यक्रमाचे उदघाटन औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या जेष्ठ विधिज्ञ आशाताई शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगाराचे आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शीघ्रकवी रमेश पोतदार ,आदर्श शिक्षक शालिग्राम निकम, राज्य परिवहन महामंडळाचे माजी उपमुख्य  सुरक्षा अधिकारी एन.के.सांगळे हे उपस्थित होते.

उद्घाटकीय भाषणात अॅङ. शिरसाठ यांनी सुरक्षित मोहिमेदरम्यान  वाहन चालवताना चालक-वाहक यांनी काय काय काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे  वाहतुकी संबंधीच्या वेगवेगळ्या कायद्या बाबतच्या तरतुदी सखोलपणे विशद केल्या.महाराष्ट्राच्या सर्वांगिन विकासात राज्य परिवहन महामंडळाचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात आगारप्रमुख संदीप निकम यांनी चालक-वाहक हे राज्य परिवहन महामंडळाचा कणा असल्याचे प्रतिपादन करून  मोहिमेदरम्यान प्रवासी जनतेला  सुरक्षित सेवा प्रदान करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्याबाबत  मार्गदर्शन केले तसेच राज्य परिवहन महामंडळ प्रवासी जनतेची विश्वासार्हता जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

राज्य परिवहन महामंडळात 25 वर्ष अविरत सुरक्षित सेवा देणारे चालक सिताराम पाटील,राजू पाटील,शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एन.के. सांगळे, रमेश पोतदार, शालिग्राम निकम यांनी काव्यात्मक पद्धतीने सुरक्षित मोहिमेचे महत्त्व उपस्थित चालक-वाहकांना पटवून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाठक यांनी तर आभार प्रदर्शन आशा निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊसाहेब हडपे,संतोष वाघ, आनंदा साळुंखे, आनंदा सोनटक्के किरण काकडे, कमलाकर सताळे,प्रशांत मोरे,सुरेश गायकवाड यांनी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.