जळगाव ;- जनसेवा विचारधारा फाऊंडेशन व जयभवानी ग्रूप यांच्यावतीने महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त कुसुंबा खुर्द ग्रामपंचायत परिसर येथे आज दुपारी ४ वाजताशालेय विद्यार्थी व शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आले. प्रमुख पाहुणे जनसेवा विचारधारा फाऊंडेशन अध्यक्ष निलेश बोरा,शिवाजी राजपूत यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात येऊन महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रमाचे आध्यक्ष युवक गौरव राजपूत यांनी आपल्या मनोगतात क्रांतीसुर्य महाराणा प्रताप याचा जीवन संघर्ष थोडक्यात व्यक्त केला. जयभवानी ग्रूप चे स्वप्नील पाटील, धनपाल पाटील,मंगलसिंग राजपूत(कुसुंबा), राहुल कासार, कुणाल कासार, अजय बोरसे, दिनेश पाटील, प्रवीण कोळी,अजय गुरचळ , तसेच महिलातर्फे शोभाताई पाटील, मीनल ताई पाटील, आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कुमारसिंग राजपूत व विलास राजपूत यांनी केले.सदर शिबिर दिनांक १६ आणि १७ जून असे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या कागद्पत्रसंदर्भात तसेच शासकीय योजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे . यावेळी असंख्य तरुणांनी या शिबिराचा लाभ घेतला . यावेळी समाधान पवार,सीताराम भोई,अशोक लोहार,भारत ससाणे आदीनि परिश्रम घेतले .