रक्षा खडसे यांना ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद
भुसावळ | प्रतिनिधी
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे उपचार घेऊन परत आल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाने उधाण आले आहे . भाजपा शिवसेना आरपीआय (आठवले ) शिवसंग्राम व रासप महायुतीच्या उमेदवार विद्यमान खा . रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ रॅलीस आज दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता येथील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यास माल्यार्पण करून प्रारंभ करण्यात आला . ढोल ताश्याच्या गजरात निघालेल्या या रॅलीत आमदार संजय सावकारे ,नगराध्यक्ष रमण भोळे, युवराज लोणारी , दीपक धांडे मनोज बियाणी राजेश पारीख , मुकेश पाटील , वसंत पाटील , पुरुषोत्तम नारखेडे , प्रा डॉ सुनील नेवे , रमेश मकासरे यांचेसह महायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले होते . तर ,सौ रजनी सावकारे , सौ मीना लोणारी, माजी उपनगराध्यक्षा सौ लक्ष्मी मकासरे , सौ अलका शेळके , शैलजा पाटील यांचेसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती , प्रभाग क्रमांक ८ या भागात प्रचार करतांना महायुतीच्या पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटी देत प्रचार केला .या प्रचारात वयोवृद्ध व अपंग बांधव सुद्धा सहभागी होऊन प्रचार करीत होते .
दरम्यान तालुक्यातील जाडगाव , मन्यारखेडा , फुलगाव , साकरी , साकेगाव परिसरात प्रचारार्थ विद्यमान खा रक्षा खडसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर ढवळून काढला . यावेळी गावागावात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले तर अनेक ठिकाणी सौभाग्यवतींनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या रक्षाताई मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आशीर्वाद थोरामोठयांनी देऊन काळजी करू नका असा दृढ विश्वास व्यक्त केला . यावेळी जि प सदस्या पल्लवी सावकारे , प्रतिष्ठां महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे , प स सभापती प्रीती पाटील , यांचेसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते .