Monday, January 30, 2023

महामार्गावर दुचाकीची समोरासमोर धडक; महिलेचा मृत्यू

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

नशिराबाद ते भुसावळ महामार्गावर असलेल्या माऊली पेट्रोल पंपाजवळ राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना शनिवारी घडली होती. याप्रकरणी रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अज्ञात दुचाकीचालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद ते भुसावळ दरम्यान इकबाल शहा सांडू (वय ४५, रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद ता. जि.जळगाव ) हे त्याची पत्नी सरताजबी इकबाल शहा (वय ४२) यांच्यासह २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीयू ३५५८) ने दुचाकीने नशिराबादकडून भुसावळकडे जात असतांना समोरून राँग साईडे अनोळखी नंबरवरील दुचाकीधारकाने जोरदार धडक दिली.

- Advertisement -

या अपघातात सरताजबी शहा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.

 

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे