महामार्गावर अज्ञात ट्रकची मोटरसायकला धडक, एक ठार तर एक गंभीर जखमी

0

यावल | प्रतिनिधी  

येथील यावल भुसावळ मार्गावरील रस्त्यावर मोटरसायकल व अज्ञात ट्रकच्या झालेल्या भिषण अपघातात दोन जणं गंभीर जख्मी अज्ञात ट्रकचालक वाहन उलट दिशेला घेवुन पसार . या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की , यावल ते भुसावळ मार्गावरील जुने भुसावळ नाक्यावर दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास यावल हुन भुसावळकडे जात असलेल्या मोटरसायकल क्रमांक  एमएच १९बी२१८o७या आपल्या मोटरसायकल वाहनाने यावल येथील आठवडे बाजार परिसरातील राहणारे शेख शकील शेख ईबा , ( मिस्त्रि)वय ४७ वर्ष आणी दहिगाव येथील मेहमुद खान फकीरा खान , वय ५२ वर्ष हे दोघ ही बांधकाम कारागीर भुसावळकडे कामाला जात असतांना भुसावळकडुन यावलच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात दोन जणं गंभीर जखमी झाले असुन यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे . अपघात झाल्यानंतर सदरचा ट्रकचालकाने आपल्या ताब्यातील मोटरवाहनाची दिशा पालटुन पुन्हा भुसावळच्या दिशेने पसार झाला असुन, घटनास्थळा जख्मींना तात्काळ उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ . शुभम तिळके , अधि परिचारिका निलीमा पाटील , आरोग्य सेवक कादर तडवी यांनी प्रथम उपचार केल्यावर दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे .दरम्यान यावल येथील अपघातात गंभीर जख्मी असलेले शेख शकील शेख ईबा यांना जळगाव येथे उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिकेने घेवुन जात असतांना भुसावळ जवळ रुग्णवाहिकेत त्याचा मृत्यु झाला .

Leave A Reply

Your email address will not be published.