Friday, August 12, 2022

महामंडळाकडून आजपासून मोफत पास – ना.गुलाबराव पाटील

- Advertisement -

931 गावांच्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

- Advertisement -

जळगाव, दि. 30-
प्रशासनाने दुष्काळी उपाययोजना अंमलबजावणी न केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा केवळ इशारा न देता शिवसेनेचे उपनेते सहकार तथा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्य तत्परता दाखवुन राज्य परिवहन महामंडळाकडुन विद्यार्थ्यांना मोफत प्रवास पास सवलत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करुन घेतली आहे. शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते व रा.प. मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन ना.गुलाबराव पाटील यांनी या संबंधीचे परिपत्रक काढण्याबाबत मागणी केली होती. जळगावसह परभणी व राज्यातील अन्य 6 विभाग नियंत्रकांना विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याबाबतचा आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने सुरुवातीला 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. दरम्यान, शिवसेनेचे उपनेते राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातुन जळगाव जिल्ह्यातील धरणगाव व एरंडोल तालुक्यातील 108 गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला. नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यात विद्याथ्र्यांना मोफत शैक्षणिक प्रवास पास सवलत उपलब्ध करुन दिली जात नसल्यामुळे राज्यमंत्री गुलाबराव पाटील व जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडे विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
जि.प. सदस्य प्रताप पाटील यांनी काही दिवसापुर्वी जळगाव विभाग नियंत्रक श्री देवरे यांच्या दालनात बैठक घेऊन व परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करुन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईत गेलेले राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते व संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. धरणगाव येथे झालेल्या जाहीर सभेतही याबाबत खंत व्यक्त केली होती. त्यानंतर रा.प. महामंडळाने तातडीने कार्यवाही करून 8 जिल्ह्यांच्या विभाग नियंत्रकांना आदेशीत करण्यात आले आहे.
महसूल व वन विभागाच्या दिनांक 8 जानेवारी 2019 अन्वये शासन निर्णयानुसार 8 जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 50 महसूल मंडळातील 931 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाहोता. त्या अनुषंगाने महामंडळातर्फे अतिरिक्त दुष्काळ घोषित झालेल्या 14 तालुक्यातील महसूल मंडळातील विद्यार्थ्यांना विद्यार्थी मासिक पास सवलत देण्यात येत असल्याचा निर्णय घेतलेला असून त्याबाबतचे पत्र काल दि. 30 जानेवारी 2019 रोजी धुळे, जळगाव , नगर, परभणी , जालना , उस्मानाबाद, सातारा व बुलढाणा येथील सर्व विभाग नियंत्रकांना महाव्यवस्थापक (वाहतूक ) यांनी आदेश दिले आहे.
ना. गुलाबराव पाटील यांनी कार्य तत्परता दाखवुन या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या पाठ- पुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 30 हजाराच्यावर विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या अंमल बजावणीमुळे विद्यार्थी व पालक आनंदित झाले असून ना.गुलाबराव पाटील यांच्या विषयी समाधान व्यक्त करीत आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या