महापौर व उपमहापौरपदासाठी भाजपतर्फे प्रत्येकी दोन उमेदवार अर्ज दाखल

0

जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेने अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने आज आश्‍चर्यकारकरित्या महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. यात महापौरपदासाठी सौ. भारतीताई सोनवणे व प्रतिभाताई कापसे तर उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांना उमेदवारी देण्यात आली असून यापैकी प्रत्येकी एक नाव आज सायंकाळी फायनल होणार आहे.

आज शिवसेनेतर्फे महापौरपदासाठी सौ. जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर भाजपने औरंगाबाद खंडपिठातील याचिकेच्या निकालाची वाट पाहिली. साधारणपणे एक वाजेच्या सुमारास न्यायालयाने ही याचिका फेटाळण्यात आल्यानंतर पक्षातर्फे महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

यामध्ये महापौरपदासाठी सौ. भारतीताई सोनवणे व प्रतिभाताई कापसे तर उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापैकी प्रत्येकी एक नाव आज सायंकाळी फायनल होणार आहे.  याप्रसंगी भाजपचे गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.