महापौरांच्या प्रयत्नांनी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्लास्टिक कोट वितरीत!

0
जळगाव : – शहरातील मनपा रुग्णालयात कार्यरत असलेले व विविध परिसरात जाऊन सर्व्हेक्षण करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी त्यांना प्लास्टिक कोट मिळावे यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सुप्रीम कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्लास्टिक कोट मनपा प्रशासनाच्या स्वाधीन केले. सोमवारी महापौरांनी ५०० प्लास्टिक कोटचे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना वितरण केले.
मनपाच्या सभागृहात आयोजित याप्रसंगी महापौर भारती सोनवणे,  उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, आयुक्त सतिष कुलकर्णी, सुप्रीम कंपनीचे विपुल पारेख, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.राम रावलानी, माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख, नगरसेवक किशोर बाविस्कर उपस्थित होते.
जळगाव शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना राबविताना आणि विविध परिसरात नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी मनपा प्रशासनाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी हे दररोज झटत असतात. आरोग्य सेवा बजावत असलेल्या मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी प्लास्टिक कोट उपलब्ध व्हावे अशी मागणी त्यांनी केली होती.
महापौरांनी केला पाठपुरावा*
महापौर भारती सोनवणे यांनी तात्काळ सुप्रीम कंपनीचे मार्केटिंग विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर विपुल पारेख यांच्याशी चर्चा केली होती. महापौरांच्या विनंतीला मान देत सुप्रीम कंपनीकडून पोंचो प्रकारातील ५०० प्लास्टिक कोट सोमवारी उपलब्ध करून देण्यात आले. दुपारी ५ वाजता सर्व कोट आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.