Sunday, May 29, 2022

महापुराच्या पार्श्वभूमीवर अंशतः बाधित बोहरा गावातील १७६ कुटूंबाचे त्वरित पुनर्वसन करा…

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (अ) ने केली मागणी..

- Advertisement -

अमळनेर :- येथील बोहरा गावाला नेहमी पुराचा धोका निर्माण होत असल्याने गावातील १७६ कुटूंबाचे मानवतेच्या दृष्टीने त्वरित पुनर्वसन करावे, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी(अ) च्या माध्यमातून अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले.

- Advertisement -

बोरी-तापी-अनेर या तिन्ही नद्यांना एकाच वेळेस पावसाळ्यात किंवा एखादया दिवसानंतर पुर आला तर महापुराचे स्वरुप येते. त्यामुळे काठावर वसलेली १७६ कुंटुबांची वस्तीच्या लोकांमध्ये घबराट व भिती निर्माण होते व रात्रदिवस जागे राहुन संकटाची परिस्थीतीला सामोरे जावे लागते अशी बिकट परिस्थिती निर्माण होते. त्यावेळेस काठावर वसलेले सर्व वस्ती त्यामुळे जिवीत हानी होण्याची मोठी भिती निर्माण होते त्यासाठी तात्पुरते स्थलांतर करावे लागते व गुर- ढोरांना बांधण्यासाठी देखील कुठलीही जागा शिल्लक राहत नाही.तसेच संकट परिस्थितीत जिव वाचवण्यासाठी कोणतेही साधन राहत नाही.काठावर वसलेल्या वस्तीतील घरांची पडझड होते व घरांना त्याकाळात सतत ओलावा असतो. तसेच सर्द वातावरण असते. तसेच रोग- राई परिस्थिती निर्माण होते.गाई, म्हशी, शेळी-मेंढ्या, यांच्यावर साथीचे रोग येतात. अशी सर्व परिस्थिती निर्माण होत राहते.
पाडळसर धरणाचे काम सुरु करण्यात आले. सदर प्रकल्पाची उच्ची १३९.२४ तलांक आहे. प्रत्यक्षात पाणी अडवल्यामुळे बॅक वाटरची उच्ची वाढली. तसेच हतनुर धरणाचे काही प्रमाणात दरवाजे उघडले तर मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढतो. दर वर्षी हतनुर धरणाचे दरवाजे उघडले जाते. त्यामुळे काठावर वसलेली वस्तीच्या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवुन जिव मुटीत धरुन राहतात. लोकवस्तीपासुन निम्न तापी प्रकल्प एक ते दिड किलोमीटर अतंरावर आहे. त्यामुळे काठावर वसलेले १७६ कुटुंबाची कायमस्वरुपाचा पाण्याचा पुराचा धोका असतो. महाराष्ट्र शासनाने बोहेरे गावाला अंशःता बांधीत म्हणुन समाविष्ट केलेले आहे.तरी ते लवकरात लवकर पुर्नवसन होणेस रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया(आंबेडकर गट ) ता. अमळनेर, जि.जळगांव यांच्या वतीने विनंती पुर्वक निवेदन देण्यात आले आहे. सदर पुर्नवसन न झाल्यास भविष्यात कोकणात घडलेल्या माळीण तळीये गावांसारखी भुख्खलनाची परिस्थिती ओढण्याची दाट शक्यता असुन जिवीत व
वित्ती हानी होवु शकते. तरी महाशयांनी आमच्या निवेदनाचा सहानुभुती पुर्वक व मानवतेचा दृष्टीकोनातुन विचार करुन योग्य न्याय द्यावा. व पुर्नवसन करावे अशी ही मागणी करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपकभाऊ निकाळजे,राष्ट्रीय महासचिव मा.मोहनलालजी पाटील, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भाऊ दरोळे यांचे मार्गदर्शनानुसार जळगाव जिल्हा महासचिव मा.यशवंतभाऊ बैसाणे, युवा तालुकाध्यक्ष भगवानभाई संदानशिव, तालुकाध्यक्ष मा.पितांबर वाघ, माजी मुख्याध्यापक मा.अरुण घोलप सर, अॅड सतिश सैंदाणे पंकज सोनवणे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी बोहरे येथील १७६ बाधीत कुटूंबातील कुटूंब प्रमुख तसेच सोपान धनगर ग्रा.प.सदस्य, गणेश पवार ग्रा.प.सदस्य, छन्नु मोरे,देविदास फुलपगारे ग्रा.प.सदस्य,चंद्रकांत कोळी ग्रा. पं सदस्य, उत्तम धनगर , सचिन पाथर्वट रुपचंद धनगर, किरण बच्छाव विनोद मोरे गोविंदा भिल दिपक सैंदाणे निलेश सोनवणे नाना सैंदाणे रमेश मैलागीर मुन्ना सोनवणे विनोद मोरे गोविंदा भिल संजय भिल भरत भिल धिरज कोळी संतोष मैराळे मधुकर सैंदाणे पोपट निकम सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या