पारोळ्यात युतीचा मेळावा पोलिस बंदेाबस्तात
पारोळा -जळगांव महापालिकेत देवकर यांनी घोटाळा केला त्यामुळे त्यांना आजदेखील कोर्टात चकरा माराव्या लागत असुन अश्या भ्रष्ट उमेदवारास आपण निवडुन देणार का?असा प्रश्न करित युतीच्या कार्यतत्पर आमदार उन्मेष पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन ना.गिरीष महाजन यांनी केले.
माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयाजवऴ आयोजित मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,माजी आमदार चिमणराव पाटील,आ उन्मेष पाटील,आ.चंदु पटेल,ना.गुरुमुख जगवाणी,आ.किशोर पाटील,ना.उज्वला पाटील मच्छिद्र पाटील,नगराध्यक्ष करण पवार,नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे,सुरेंद्र बोहरा,किशोर काळकर,बाळासाहेब पवार,डाँ हर्षल माने,समीर पाटील,यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मार्केट कमेटी संचालक चतुर पाटील,सुरेंद्र बोहरा,वामन चौधरी वसंतराव केदार,विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केली तर नगराध्यक्ष करण पवार यांनी विकासाच्या गप्पा मारणार्यांना आता धडा शिकविण्याची वेळ आली असुन मतदार संघाचा विकास खुंचल्याची खंत व्यक्त केली.तर गुलाबराव वाघ यांनी सांगितले कि,युतीचा उमेदवार निवडला तर उपेक्षित प्रश्नांना न्याय मिळेल.म्हणुन हक्काचा माणुस आ उन्मेष पाटील असुन त्यांना मताधिक्याने निवडुन आणण्याचे आवाहन केले.तर आ किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांनी एक दिलाने युतीचा उमेदवार निवडुन आणावा जेणे करुन मतदार संघाचा विकास होईल आपआपसातील मतभेद बाजुला सारुन एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.तर आ उन्मेष पाटील यांनी नागरिकांना आश्वासित केले कि,मला विजयी करा,प्रामाणिकपणे काम करुन सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडुन केंद्रातील अनेक योजना मतदार संघात आणुन विकासाचे पर्व मतदार संघात निर्माण करुन शेतकरी व सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
आमदार व खासदार यांच्यामुळे बोंडअळीचे अनुदानापासुन शेतकरी वंचित माजी चिमणराव पाटील
संपुर्ण जळगांव जिल्ह्यास बोंडअळीचे बागायती अनुदान मिळाले परंतु मतदार संघातील आमदार व खासदार यांच्या दुर्लक्षा मुळे शेतक ऱयायां ना बोंडअळीचे बागायती अनुदान न मिळाल्याचा आरोप करित एरंडोल व पारोळा मतदार संघात बोंडअळी बागायती अनुदानासाठी आम्ही प्रयत्नशिल असुन ना.गिरीष महाजन यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे सांगित भाजपचे जसे संकटमोचक म्हणुन भाऊंची ओळख आहे तशी शिवसेनेचे संकटमोचक म्हणुन गिरीष भाऊंनी भुमिका साकारावी असे माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा आर बी पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन अँड अतुल मोरे यांनी मानले.
छाया- मेळाव्यास मार्गदर्शन करतांना ना गिरीष महाजन,माजी आ चिमणराव पाटील,आ उन्मेष पाटील,आ किशोर पाटील व पदाधिकारी