Thursday, February 2, 2023

महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील शिवाजी नगर भागातील हुडको परिसरात महापालिकेचे कर्मचारी वालमन पाणी सोडण्यासाठी जात असतांना दोन जणांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहरपोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमाकांत संभाजीराव चव्हाण (वय ५८, रा. पिंप्राळा शिवार जळगाव) हे जळगाव महापालिकेत वालमन म्हणून कर्मचारी आहे. ते शहरातील विविध भागात पाणी सोडण्याचे काम करतात. मंगळवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उमाकांत चव्हाण हे त्यांच्या दुचाकीने शिवाजी नगर हुडको भागात पाणी सोडण्यासाठी जात असतांना जनार्दन कोळी आणि गणेश (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. शिवाजी नगर यांनी चव्हाण यांचा रस्ता आडविला.

- Advertisement -

दोघे दारूच्या नशेत होते. तु पाणी लवकर सोड असे सांगून उमकांत चव्हाण यांना तोंडावर व डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. तर त्याच्या दुचाकीचे नुकसान केले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी उमाकांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रात्री ८ वाजता शहरपोलीस ठाण्यात जनार्दन कोळी आणि गणेश या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जगदीश मोरे करीत आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे