Monday, September 26, 2022

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. यात ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता साधेपणाने महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्य शासनानं मनाई केली आहे. सभा, संमेलनं घेण्यास किंवा मोर्चा काढण्यासही राज्य शासनानं परवानगी नाकारली आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घरूनच अभिवादन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

 राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावली

1) यंदा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक ६ डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे.

2) महापरिनिर्वाण दिन हा परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे.

3) कोविड १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्रमांक ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

4) शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. या कार्यक्रमासाठी जे व्यक्ती अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील.

5) कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी / शिवाजी पार्क मैदान परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ / पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत. तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा , धरणे , निदर्शने , आंदोलने व मोर्चे काढू नयेत.

6) महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे तालुके यामध्येही आयोजित करण्यात येत असल्याने त्यासंदर्भात स्थानिक / जिल्हा प्रशासनाने कोविड १९ च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व त्यासंबंधीचे आदेश काढावेत.

7) कोविड १९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग , मदत व पुनर्वसन विभाग , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्व नागरिकांनी करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन व स्थानिक प्रशासन स्तरावरुन आणखी काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असे या नियमावलीत नमूद करण्यात आलेले आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या