भुसावळ –
वाराणसीहून मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसचा संभाव्य अपघात प्रवाशांच्या सतर्कतेमुळे टळला.सदर गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावरून सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास सुटल्याच्या एका मिनिटानंतर घडली. प्राप्त माहितीनुसार११०९४ अप वाराणसी मुंबई महानगरी एक्सप्रेस सुटल्यानंतर लगेचच काही अंतरावर रेल्वे नजीक असलेल्या एक लोखंडी रॉड सदृश्य वस्तू बॅटरी बॉक्सवर आदळून बॅटरी बॉक्स मध्ये जाऊन रुतली.ही बाब प्रवाशांच्या लक्षात आल्याबरोबर गाडी त्वरित थांबवण्यात आली.बॅटरी बॉक्समध्ये रुतलेला लोखंडी रॉड रेल्वे कर्मचाऱ्यांनी काढून टाकला.या सर्व घडामोडीत गाडीला चाळीस मिनीटे विलंब झाला तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे पाऊण तास खोळंबली होती.