जळगाव : मू.जे.महाविद्यालयात रोटरेकट् क्लब ऑफ कॉमर्स यांच्या वतीने ‘महादान’ या रक्तदान शिबिरात ५० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी केले. यावेळी वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.अनिल सरोदे, समन्वयिका डॉ.कल्पना नंदनवार, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस.एन.तायडे, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे समन्वयक सीए ए.एन.आरसीवाला, रोटरेकट् क्लबचे प्रादेशिक प्रतिनिधी शंतनू अग्रवाल उपस्थित होते. रेडक्रॉस सोसायटीचे डॉ.बशीर, डॉ.सीमा शिंदे, डॉ.किरण बाविस्कर यांनी सहकार्य केले. रोटरेकट् क्लबची अध्यक्ष नेहा खंडार, चिटणीस आदित्य पाटील, प्रकल्पप्रमुख जागृती बाविस्कर यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.