भुसावळ :- येथील बस स्थानकाजवळ महात्मा बसवेश्वर जयंती निमित बसाव ब्रिगेड तर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सर्व प्रथम महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस भारतीय ओडबसम क्रांतीचे प्रमुख जगन सोनवणे व बसव ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख तुषार शिवपुजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर गरिबांना अन्नदान,शरबत वाटप कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी समाज बांधव,लिंगायत धर्मी व विविध १० संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.