भडगाव | प्रतिनिधी
कोरोना चा प्रसार असल्याने या वर्षी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची यांची जयंती ही घरोघरी साजरी करून जमलेली वर्गणी ही मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असा निर्णय भडगाव माळी समाज पंच मंडळाने घेतला असता आज तहसिलदार यांच्याकडे 12777 ( बारा हजार सातशे सत्यातर) रुपयाचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे माळी पंच मंडळ तर्फे क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 11 एप्रिल रोजी शहरात जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु या वर्षी कोरोना या विषाणू ने सर्वत्र थैमान घातले असून महात्मा फुले जयंती ही घरातच साजरी करावी व जयंतीला जमा होणारी वर्गणी ही मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करायची असा निर्णय घेण्यात आला होता. म्हणून आज तहसिलदार माधुरी आंधळे यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीत माळी समाज पंच मंडळाने 12777 ( बारा हजार सातशे सत्यातर) रुपये जमा झालेली वर्गणी ही चेक स्वरूपात जमा करण्यात आली. या वेळी भिकन महाजन, सुरेश महाजन, प्रविण महाजन, पत्रकार सागर महाजन, विलास महाजन, विनोद महाजन, संजय महाजन आदी उपस्थित होते.
